नवी दिल्ली : हा उपवास नव्हे तर उपहास आहे, भाजपचं टीकास्त्र

Continues below advertisement
अॅट्रोसिटी कायद्यातील बदल आणि दलितांवर होणारे अत्याचार याविरोधात काँग्रेसकडून आज देशभरात एक दिवस लाक्षणिक उपोषण केलं जातं आहे. मात्र याची सुरुवात जिथून झाली त्या राजघाटावर खुद्द काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीच ३ तास उशिरानं पोहोचले. यावरुन हा उपवास नसून उपहास असल्याची टीका भाजपनं केली. राहुल गांधींच्या लाक्षणिक उपोषणाची वेळी १० ची होती, मात्र राहुल गांधी राजघाटावर १ वाजता पोहोचले. तर मुंबईतही काँग्रेस कार्यकर्त्यांनी १० ऐवजी ११ वाजता उपोषणाला सुरुवात केली. याबरोबरच महाराष्ट्रात नागपूर, सोलापूरसह विविध ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी उपोषण केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram