नवी दिल्ली : काश्मीरमधील मुफ्ती सरकारमधून भाजप बाहेर, मेहबुबा मुफ्तींचा राजीनामा

जम्मू काश्मीरमध्ये एकमेकांच्या विरोधी विचारधारेच्या सरकारचा अखेर कडेलोट झाला आहे. जम्मू काश्मीरमधील पीडीपी-भाजप सरकारचा संसार तीन वर्षातच मोडला आहे. भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतलात्यामुळे पीडीपी नेत्या आणि जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी राजीनामा दिल्याने, जम्मू काश्मीरमधील सरकार कोसळलं आहे.

ज्या उद्देशाने युती झाली होती ते हेतू होते ते पूर्णपणे अपयशी ठरल्याचं कारण देत, जम्मू- काश्मीर सरकारमधून भाजप बाहेर पडलं आहे. भाजपने मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी सरकारचा पाठिंबा काढला आहे.

भाजप नेते आणि जम्मू काश्मीरचे भाजप प्रभारी राम माधव यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतचा निर्णय जाहीर केला.

सीमेवरील तणाव, शस्त्रसंधीचं उल्लंघन, जवानांवर होणारी दगडफेक, कठुआ गँगरेप याबाबतच्या मुद्द्यावरुन भाजप आणि पीडीपीमध्ये तणाव होता. त्याचा शेवट आज युती तुटण्यातून झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola