नवी दिल्ली : भाजपचं नवीन मुख्यालय देशाच्या सेवेसाठी समर्पित : पंतप्रधान मोदी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Feb 2018 03:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या नवीन मुख्यालयाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यामुळे भाजप मुख्यालयाचा पत्ता आता 11 अशोका रोड ऐवजी दीनदयाल उपाध्याय मार्ग असा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा आणि कॅबिनेटमधल्या अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं . अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलंय. 2 एकराच्या परिसरात भाजपनं हे नवं मुख्यालय उभारलं आहे.