नवी दिल्ली : 2019 साठी भाजपची वॉर रुम, नव्या मुख्यालयाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन
Continues below advertisement
भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या मुख्यालयाचा पत्ता आता 11 अशोका रोड ऐवजी 6, दीनदयाल उपाध्याय मार्ग असा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहांच्या उपस्थितीत या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं आहे. या कार्यक्रमाला लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते उपस्थित होते. अवघ्या 16 महिन्यांत या पाच मजली अत्याधुनिक इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं आहे
Continues below advertisement