नवी दिल्ली : 'भारत बंद'च्या अफवेनं पोलिसांची डोकेदुखी, अनेक राज्यात गृहखात्याकडून हायअलर्ट
अॅट्रॉसिटी कायद्यातील बदलांविरोधात पुन्हा एकदा भारत बंदची हाक दिल्याची अफवा गृहखात्याची डोकेदुखी ठरली आहे. या अफवेचा फायदा घेऊन कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी केंद्रीय गृहखात्यानं संवेदनशील राज्यांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. ज्यात मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहारचा समावेश आहे. या चारही राज्यांमधील संवेदनशील जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आलं आहे.