नवी दिल्ली : बैलगाडी शर्यतीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
बैलगाडी शर्यतीबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं तामिळनाडूच्या जलीकट्टू बाबत दिलेल्या निर्णयामुळं महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतही धोक्यात आली होती. बैलगाडा शर्यत सुरु ठेवण्यासाठी राज्य सरकारला प्रिव्हेन्शन टू क्रुएल अॅक्ट काही बदल करावे लागणार होते. त्यानुसार सरकारनं कायदाही केला. मात्र, या विरोधात प्राणीप्रेमी अजय मराठे यांनी उच्च न्यायालयात होती. त्यावर उच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायलयात धाव घेतली होती.
Continues below advertisement