नवी दिल्ली : राहुल गांधींचं मोदींशी हस्तांदोलन योग्य, गळाभेटीचं अशोक चव्हाणांकडून समर्थन
Continues below advertisement
विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान संपूर्ण देशाला अनपेक्षित असलेली एक घटना आज घडली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांची लोकसभेत गळाभेट घेतली. महत्वाची बाब म्हणजे मोदी यांनीही या गळाभेटीचा स्वीकार करत राहुल यांच्याशी हस्तांदोलन केलं. तत्पूर्वी राहुल यांनी महिला असुरक्षितता, मॉब लिंचिंग, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्याचबरोबर देशात राग, द्वेषाचं वातावरण असून, त्याला पंतप्रधान, भाजप आणि संघ जबाबदार असल्याचा घणाघाती आरोपही राहुल यांनी केला. तसंच आज मोदी, संघ आणि अमित शाह यांच्यामुळेचं मला हिंदू धर्म, हिंदूस्तान कळू शकला, असा टोलाही राहुल यांनी लगावला. त्याचबरोबर भाजपकडून करण्यात येणाऱ्या पप्पूच्या उल्लेखालाही राहुल यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
Continues below advertisement