नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं धरणं आंदोलन अखेर मागे

Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी धरणं आंदोलन अखेर मागे घेतलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून केजरीवाल नायब राज्यपालांच्या निवासस्थानी आंदोलन करत होते. आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यासह इतर मागण्या केजरीवाल यांच्या होत्या.

अरविंद केजरीवाल हे आता नायब राज्यपालांच्या निवासस्थानातून बाहेर पडतील. मात्र हे धरणं आंदोलन नव्हतं, तर आम्ही नायब राज्यपालांच्या भेटीसाठी वाट पाहत होतो, असे मनिष सिसोदिया म्हणाले.

“आज अनेक मंत्र्यांनी बोलावल्यानंतर आयएएस अधिकारी आले. आमचं काही कुठल्या आयएएस अधिकाऱ्याशी भांडण नाही. तसेच काही अधिकाऱ्यांनी आज असेही संकेत दिले की, त्यांना वरुनच आदेश होते. अधिकारी आज बैठकीला आले, तसे उद्याही यावे.”, असेही मनिष सिसोदिया म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram