नवी दिल्ली : पतीच्या अंत्यसंस्कारासाठी 5 दिवसांच्या बालकासह महिला सैन्य अधिकाऱ्याची हजेरी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या पतीच्या अंतिमसंस्कारासाठी भारतीय सैन्यातली एक महिला अधिकारी आपल्या 5 दिवसांच्या नवजात बालकासह दाखल झाली. कुमुद डोगरा असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे. कुमुद यांचे पती दुष्यंत भारतीय सैन्यात विंग कमांडर होते. मात्र 15 फेब्रुवारीला त्यांचं मायक्रोलाईट हेलिकॉप्टर माजुली आईसलँड भागात कोसळलं. यामध्ये विंग कमांडर जयपाल जेम्स आणि विंग कमांडर दुष्यंत वत्स यांचं निधन झालं. दुष्यंत यांच्या अंतिम संस्कारावेळी कुमुद या आपल्या सैनिकी पेहरावात आपल्या 5 दिवसांच्या नवजात बालकाला घेऊन दाखल झाल्या. आधी देश नंतर कुटुंब हे ब्रीद त्यांनी इथंही आपल्या वागणुकीतून सार्थ ठरवलं. महिला अधिकाऱ्याचं सध्या सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.