नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपालांमधील नेमका वाद काय?

Continues below advertisement
उपराज्यपालांच्या कार्यालयाबाहेर सुरु असलेल्या केजरीवाल यांच्या उपोषणाला चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनंतर आता शिवसेनेनंही पाठिंबा दिला आहे. ज्या सरकारला लोकांनी प्रचंड बहुमतांनी निवडून दिलंय, त्यांना त्यांच्या पद्धतीने राज्य कारभार करण्याचा अधिकार मिळायला हवा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
चार महिन्यांपूर्वी दिल्लीच्या सचिवालयात आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांवर मुख्य सचिव अंशू प्रकाश यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दिल्लीच्या आयएएस अधिकाऱ्यांनी सरकारशी असहकार पुकारला.
यामुळे अधिकाऱ्यांना तातडीनं कामावरु रुजू होण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी गेल्या 8 दिवसांपासून केजरीवाल उपराज्यपालांच्या कॅबिनबाहेर उपोषणाला बसले आहेत.
काल याबाबत, पंतप्रधानांनी यात हस्तक्षेप करण्याची मागणी
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी, आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबूंनी केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram