नवी दिल्ली: अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस
Continues below advertisement
दिल्लीतील रामलीला मैदानावर सगल पाचव्या दिवशी अणअणा हजारेंचं आंदोलन सुरु आहे.
अण्णांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्याचं वजन तब्बल पाच किलोंनी घटलंय. अशी माहिती अण्णा हजारेंचे स्वीय सचिव सुरेश पठारे यांनी दिलीय.
दरम्यान अण्णांच्या आंदोलनावर आज तोडगा निघण्याची शक्यता आहे.
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काल रामलीला मैदानावर जाऊन अण्णांशी चर्चा केली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचंही गिरीश महाजन यांनी सांगितलं.
मात्र जोपर्यंत सरकार लेखी आश्वासन देत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही. असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय.