नवी दिल्ली : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस, अण्णांचे सहकारी सुरेश पठारेंशी बातचीत

Continues below advertisement
जनलोकपाल आणि शेतमालाला दीडपट भाव यासह अनेक मागण्यांसाठी दिल्लीत रामलीला मैदानावर सलग चार दिवसांपासून अण्णा हजारेंचं आंदोलन सुरु आहे. यामुळे अण्णा हजारेंचं वजन 3 किलोनं घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज केंद्र सरकारचं शिष्टमंडळ अण्णा हजारेंना भेटणार आहे. यात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश असणार आहे. महाजन यांनी कालच अण्णांना भेटीची वेळ मागितली, परंतु लेखी आश्वासन दिल्याशिवाय भेटू नका, असं सांगत अण्णांनी ती नाकारली. त्यामुळे आज आवश्यक दस्तावेज घेऊन सकाळी ११ वाजता महाजन रामलीला मैदानावर अण्णांना भेटणार आहेत. 2011 च्या जनलोकपाल वेळी दिल्लीत अण्णांच्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला पण यंदा म्हणावी तशी गर्दी जमली नाही. या सर्वांवरच अण्णांचे सहकारी सुरेश पठारेंशी एबीपी माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी संवाद साधला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram