नवी दिल्ली : भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात
Continues below advertisement
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक आज दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरूवात झाली आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, अर्थमंत्री अरूण जेटली, लालकृष्ण अडवाणी आणि 3 हजार आमदार, खासदार आणि मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदेखील या बैठकीला उपस्थिती लावली आहे. या बैठकीचा समारोप संध्याकाळी 4.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाने होणार आहे. देशभरातील भाजपच्या प्रसारासह डोकलामसारख्या आंतरराष्ट्रीय मुद्यांवरही चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement