नवी दिल्ली: विमान रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे परत मिळणार
जर तुमच्या नियोजित विमान प्रवासाला विमान कंपन्यांच्या चुकीमुळं उशीर झाला तर तिकीटाचे काही पैसे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरुपात विमान कंपन्या परत करणार आहेत. जर काही कारणास्तव विमानच रद्द झालं तर पूर्ण पैसे परत मिळणार आहेत. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.