नवी दिल्ली | रब्बी पिकांच्या हमीभावावर निर्णय होण्याची शक्यता

Continues below advertisement
दिल्लीच्या सीमेवर किसान क्रांती यात्रेतील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारल्यानंतर मोदी सरकार आज रब्बी पीकांसाठी हमीभाव जाहीर करण्याची शक्यता आहे. केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा निर्णय होण्याची चिन्हं आहेत. प्रत्येक पीकाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव निश्चितच मिळेल असा दावा सरकारी सूत्रांनी केला आहे. त्यामुळे सर्व पीकांना 50 टक्के फायदा होईल, असं सरकारचं म्हणणं आहे.
नवा हमीभाव यंदा नोव्हेंबरमध्ये लागवड केल्या जाणाऱ्या रब्बी पिकांना लागू होणार आहे. त्यांची खरेदी पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होते. सरकार दरवर्षी रब्बी लागवडीपूर्वी हमीभाव जाहीर करतं. मोदी सरकार निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, यंदा रब्बीला भरघोस हमीभाव देऊन, मतदारांना खुश करण्याची चिन्हं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola