नवी दिल्ली : आंदोलनात येणाऱ्यांनी राजकारणात जाऊ नये : अण्णा हजारे

Continues below advertisement
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनात सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला राजकारणात जाता येणार नाही. खुद्द अण्णांणीच अशी अट घातली आहे. याबद्दल तसं शपथपत्र लिहून द्यावं लागणार आहे. नवी दिल्लीमध्ये अण्णा हजारे यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते. मार्चमध्ये दिल्लीत अण्णा आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनमध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र महाराष्ट्र सदनच्या प्रशासनाला पूर्व कल्पना दिल्याशिवाय ही पत्रकार परिषद घेण्यात आलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram