Modi Cabinet | मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राज्यातील सात खासदारांना संधी | नवी दिल्ली | ABP Majha
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात राज्यातल्या 7 खासदारांना मंत्रिपद मिळणार आहे. शिवसेनेच्या गोटातून अरविंद सावंत यांना मंत्रिपद मिळणार आहे.. तर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांचा पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये समावेश होणार आहे. मोदींच्या आधीच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री पियूष गोयल, केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले मोदींच्या नव्या सरकारमध्येही कायम असणार आहेत. त्यामुळे राज्यातल्या आणखी कुणा-कुणाची मंत्रिपदी वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं आहे.