नवी दिल्ली | साखर उद्योगाला केंद्र सरकारकडून 4 हजार 500 कोटींचं पॅकेज
देशभरातल्या साखर उद्योगासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचं पॅकेज केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलंय.. साखरेच्या उत्पादनात वाढ करणं आणि येत्या हंगामात ५० लाख टन साखरेची निर्यात करण्याचं ध्येय केंद्र सरकारनं ठेवलंय..याचदरम्यान देशातल्या आणि काही राज्यांतल्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत..त्यामुळं या निर्णयाच्या माध्यमातून साखर उद्योगाला खूश ठेवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होताना दिसतोय..