ब्रेकफास्ट न्यूज | कसं साकरलं सिक्किमचं पाकयाँग विमानतळ? श्रीनिवास पाटील यांच्याशी खास बातचित

भूतान, तिबेट आणि नेपाळ या देशांच्या सीमांना जोडलेलं भारतातील एक अतिशय सुंदर राज्य सिक्कीम.. हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीमचं सौंदर्य आता आणखी खुललंय ते नुकत्याच बांधून पूर्ण झालेल्या पाकयाँग विमानतळामुळे. पाकयाँग गावावरील टेकडीवर तब्बल ९ वर्ष हे काम सुरू होतं. समुद्रसपाटीपासून साडेचार हजार फूट उंचीवर २१० एकरात जगातील सर्वात सुंदर विमानतळानं आकार घेतला ,

आता पाकयाँग बद्दल आज पुन्हा सांगण्याचं कारण असं की जगातील इंजिनियरिंगच्या या उत्कृष्ट नमुन्याचे साक्षीदार मराठमोळे आहेत. सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या कार्यकाळात या विमानतळाच्या कामाचा महत्वाचा टप्पा पूर्ण झालाय. त्यामुळे सिक्कीमचं हे विमानतळ आहे तरी कसं, सिक्कीमला याचा किती फायदा होईल, या विमानतळ बांधणीदरम्यानच्या काही खास आठवणी आपण जाणून घेणार आहोत सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्याकडूनच..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola