नवी दिल्ली : आजपासून दिल्लीत काँग्रेसचं तीन दिवसीय अधिवेशन

Continues below advertisement
राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचं आजपासून तीन दिवसीय अधिवेशन होणार आहे.
राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशन होत असल्यानं सगळ्यांचं लक्ष याकडे लागलंय.
दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियममध्ये या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय. या अधिवेशनात उद्या राहुल गांधींचं भाषण होणार आहे.
देशभरातून 12 हजार कार्यकर्ते या अधिवेशनात सहभागी होणार आहेत.
येत्या काही दिवसात कर्नाटक विधानसभा निवडणुका आहेत. त्या पाठोपाठ राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्येही विधानसभेचा आखाडा तापणार आहे. त्यामुळे यात काँग्रेस काय रणनीती ठरवते हे पाहणं महत्वाचं आहे.
राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास उंचावला आहे. सर्व मोदी विरोधकांना एकत्र करुन मोट बांधण्याचे प्रयत्नही सुरु झालेत. त्यावरही अधिवेशनात चर्चा होऊ शकते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram