नवी दिल्ली : सिंचनासाठी गडकरींची मोठी घोषणा, महाराष्ट्राला 1 लाख 55 हजार कोटींचा निधी

Continues below advertisement
राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारनं महत्वाकांक्षी निर्णय घेतले आहेत. 91 प्रकल्पांसाठी राज्याला 1 लाख 55 हजार कोटी रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत ही मदत केंद्राकडून दिली जाणार आहे. राज्यभरातल्या 91 प्रकल्पांसाठी हा पैसा पुरवला जाईल. यामुळे 3 लाख 77 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल, असा दावा गडकरींनी केला. प्रधानमंत्री सिंचन योजनेत राज्यातील मोठ्या प्रकल्पांचा समावेश असल्याचं गडकरींनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram