मुंबई : शेतकरी कर्जमाफीच्या कामासाठी राज्यातील बँका आज आणि उद्या सुरु राहणार

Continues below advertisement
सध्या राज्यातील शेतकरी कर्जमाफीवर झालेल्या टीकेनंतर कर्जमाफीच्या कामांमध्ये वेग येताना दिसतो आहे. कारण कर्जमाफीची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याच्या कामासाठी राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बँका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सर्व शाखा आज आणि उद्या सुरु राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 41 लाख शेतकऱ्यांच्या खात्यासाठी 19 हजार 537 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram