Dawood Nephew | दाऊद इब्राहिमचा पुतण्या रिझवान कासकरला खंडणीप्रकरणी अटक | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला मुंबई पोलिसांनी धक्का दिला आहे. दाऊदचा पुतण्या रिझवान कासकरला अटक करण्यात आली आहे. खंडणी मागण्याच्या आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे. खंडणी मागून तो देश सोडण्याच्या इराद्यात असतानाट मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने मुंबई विमानताळावरुन अटक केली आहे.
मुंबईतल्या दोन व्यापाऱ्यांमध्ये पैशाच्या देवघेवीवरुन वाद होता. यातील एका व्यापाऱ्याने दुबईतील डी कंपनीच्या संपर्कात आला. त्यानंतर फहीम मचमच नावाच्या व्यक्तीला मदत मागितली होती. व्यापाऱ्याने फहीमच्या साथीने दुसऱ्या व्यापाऱ्याला धमकावलं. तसेच त्याना सर्व पैसे विसरण्यास सांगितले.