मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम नैराश्येच्या गर्तेत, इक्बाल कासकरचा गौप्यस्फोट
ज्याच्या इशाऱ्यावर गुन्हेगारी विश्वाची सूत्र हलतात तो दाऊद इब्राहिम कासकर सध्या नैराश्याच्या गर्तेत बुडालाय.. आणि त्यामागचं कारण आहे दाऊद इब्राहिमच्या मुलानं घेतलेला निर्णय... मोईन कासकर.. दाऊदचा सर्वात लाडका मुलगा.. मात्र मोईननं आता मौलवी बनण्याचा निर्णय घेतलाय.. वडिलांच्या काळ्या धंद्यांमुळं कुटुंबाची जगभर नालस्ती होते आणि त्यामुळं मोईनन वडिलांच्या काळ्या धंद्याच्या जगताची सूत्र स्वीकारण्याऐवजी मौलवी बनण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय. सध्या ठाणे खंडणीविरोधी पथकाच्या ताब्यात असेलला दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकारनं हा मोठा गौप्यस्फोट केलाय. एवढंच नव्हे तर दाऊदचा मुलगा मोईननं अख्खं कुराण मुखोद्त केलंय.