राजकोट : चोरीच्या आरोपावरुन दलित युवकाची हत्या
Continues below advertisement
गुजरातच्या राजकोटमध्ये एका ३५ वर्षीय दलित युवकाची हत्या करण्यात आलीय. चोरीच्या आरोपावरुन या युवकाला रादडिया कारखान्याच्या मालकाकडून बेदम मारहाण करण्यात आली. यातच त्याचा मृत्यू झाला. लोखंडाच्या जाळीला बांधून युवकाला दांडक्यानं मारहाण केल्याची दृश्यं मोबाईल कँमेऱ्यात कैद झाली आहेत. हा युवक रादडिया कंपनीच्या जवळ त्याच्या पत्नीसोबत कचरा वेचत होता. यावेळी त्याच्यावर कंपनीच्या लोकांनी चोरीचा आरोप केला. यावर गुजरात दलितांसाठी सुरक्षित नसल्याचं ट्विट जिग्नेश मेवानी यांनी केलंय
Continues below advertisement