रायगड : दहिवाली गावातील महिलेच्या हत्या प्रकरणाचा उलगडा
Continues below advertisement
रायगडच्या दहिवली गावात 12 दिवसांपूर्वी झालेल्या महिलेच्या हत्याप्रकरणाचा अखेर उलगडा झालाय. पतीनंच पत्नीची हत्या करुन आत्महत्या केली आहे. पतीनं आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीतून दोन्ही मृत्यूंचा खुलासा झालाय. 12 दिवसांपूर्वी संतोष कसबेनं चारित्र्याच्या संशयावरुन पत्नी मनिषाची हत्या केली होती. हत्येनंतर घरातच पत्नीचा मृतदेह गाडला होता. त्यानंतर परवा संतोषनं स्वता आत्महत्या केली. संतोषचा मृतदेह सापडल्यानंतर त्याच्या खिशात आपणच पत्नीची हत्या केल्याची चिठ्ठी आढळून आली.
Continues below advertisement