पालघर : गुजरातमधील दूध रोखण्यासाठी राजू शेट्टी डहाणूमध्ये, गुजरातचं दूध आलंच नाही

Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या आंदोलनाचा धसका गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घेतलाय. कारण आज गुजरातमधून येणारी दुधाची ट्रेन रद्द करण्यात आलीय. गुजरातमधून महाराष्ट्राला होणारी दुधाची रसद रोखण्यासाठी राजू शेट्टी कालपासून डहाणू इथं तळ ठोकून होते. मात्र आज गुजरातमधून दुधाचे टँकर आलेच नाही.दूधउत्पादकाला 5 रुपयांचं अनुदान मिळावं यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हाती घेतलेल्या दूध आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे.. मुंबईत जरी जास्त परिणाम जाणवत नसला तरी तिकडे राज्य़भर आंदोलन हिंसक होताना दिसंतय.. आणि आता या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी देखील आक्रमक झालेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram