पालघर : डहाणूमध्ये मनसेचं बुलेट ट्रेन आणि अहमदाबाद हायवेविरोधात आंदोलन
डहाणू प्रांत कार्यालयात आज मनसेकडून बुलेट ट्रेन आणि मुंबई अहमदाबाद एक्सप्रेस हायवेला विरोध करण्यात आलाय. उपविभागीय कार्यालयात प्रकल्पग्रस्त शेतकरी आणि आदिवासींची बैठक ठेवण्यात आली होती. यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत या प्रकल्पाला विरोध केला. बुलेट ट्रेन आणि हायवे होऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आऱोपही करण्यात आलाय.