दादर : शिवतीर्थावर संचलन सुरु असताना कुटुंबाचा आत्महदनाचा प्रयत्न
Continues below advertisement
शिवतीर्थावर ध्वजवंदन आणि संचलन सुरु असताना आज एका कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. परभणीतल्या खान कुटुंबातील आठ जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्यासोबत रॉकेलही आणलं होतं. पोलीस कोठडीत पती समशेर खान यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला, पण संबंधित पोलिसांचं अद्यापही निलंबन करण्यात आलं नाही. तसंच आपल्याला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नाही, अशी तक्रार करत समेशर यांची पत्नी अखिला बेगम केली. अखिल बेगम यांच्यासोबत समशेर खान यांचे बंधू यासिन खान आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सहा जणांनी शिवतीर्थावर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
Continues below advertisement