Dadar Chowpatty | ... आणि दादर चौपाटीनं मोकळा श्वास घेतला | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
मुंबईच्या शिवाजी पार्कपासून हाकेच्या अंतरावर असलेली दादर चौपाटी प्रसिद्ध आहे ती साचलेला कचरा, दुर्गंधी आणि तुंबलेल्या नाल्यांसाठी. पर्यटक आणि प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं इथ दिवसाढवळ्या प्रेमी युगुलं आणि मद्यपी यांची चंगळ सुरू असते. मात्र सध्या दादर चौपाटीचं रुप पालटंलय...स्वच्छ आणि निर्मळ समुद्र किना-यावर आज इथं येणारे पर्यटक मोकळा श्वास घेत आहेत. हे साध्य झालंय ...
'बीच वॉरीयर्स' या नावानं ओळखल्या जाणा-या तरुणांच्या ग्रुपमुळे...गेल्या ९० आठवड्यांत ४०० हून अधिक स्वच्छता मोहिमा राबवून आज हे चित्र निर्माण केलं आहे. सुमारे १ हजार टन कचरा या श्रमदानातून उचलण्यात आलाय. त्यामुळे लाजेखातर मुंबई महानगरपालिका प्रशासनानंही आता ही स्वच्छता टिकवण्यासाठी दिवसभर इथं स्वच्छता कर्मचारी नेमले आहेत.