मुंबई : काँग्रेसची धुरा राहुल गांधींकडे, मुंबईत कार्यकर्त्यांचा जल्लोष
Continues below advertisement
काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधी यांची अधिकृत घोषणा करण्यात आलीय. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल गांधींशिवाय कोणीही अर्ज भरला नव्हता. तसंच आज नामांकन मागे घेण्याची मुदत देखील संपली. त्यामुळं काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींच्या नावाच्या घोषणेची औपचारिकता बाकी होती. अखेर आज अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल गांधींच्या नावाची घोषणा करण्यात आली. 16 डिसेंबरपासून राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारतील.
Continues below advertisement