मुंबई : डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर भीमसागर
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनुयायी शिवाजी पार्कात पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण दादर परिसर भीमअनुयायांनी गजबजून गेला आहे.