देशातील नऊ राज्यांमध्ये चलन तुटवडा, एटीएममध्ये खडखडाट

Continues below advertisement
नवी दिल्ली: देशातील दहा राज्यांमध्ये चलनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. यात गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेशचा समावेश आहे. तशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यातही पाहायला मिळते आहे.

एबीपी माझाने मुंबईसह चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये एटीएमचा रियालिटी चेक केला. यामध्ये शहरासह उपनगरातल्या बहुतेक एटीएम सेंटरमध्ये खडखडाट पाहायला मिळाला.

कुठे रोकड संपल्याचे फलक लावले आहेत, तर कुठे मशीन नादुरुस्त असल्याचं कारण लिहिण्यात आलं आहे. त्यामुळं ग्राहकांची मोठी तारांबळ झालेली पाहायला मिळते आहे.

तिकडे अमरावतीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांनी बँकांमध्ये गर्दी सुरु केली आहे. एटीएममध्ये पैसे का नाही, याचं कारणंही नागरिकांना कळत नसल्यानं त्यांची मोठी धांधल उडताना पाहायला मिळते आहे.

वारंवार एटीएमच्या चकरा मारुनही पैसे मिळत नसल्याने, नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे पुन्हा एकदा नोटाबंदीच्या काळासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं स्थिती आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram