500₹ Currency Notes Broken | सांगलीत घडी घालताच पाचशेच्या नोटांचे तुकडे पडले, नागरिकांमध्ये खळबळ | एबीपी माझा
Continues below advertisement
पाचशे रुपयांच्या नोटा घड्या घालताच तुटून पडण्याचा धक्कादायक प्रकार सांगलीतील विट्यात घडला आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांना प्रात्यक्षिक दाखवलं आहे. जवळपास 500 रुपयांच्या 14 नोटांबाबत (म्हणजे तब्बल सात हजार रुपये) हा प्रकार घडला असून यासंदर्भात रिझर्व बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी अनिल राठोड केली आहे. मात्र या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
Continues below advertisement