VIDEO | क्रिप्टोकरन्सी कंपनीच्या सीईओचा भारतात मृत्यू, बँक खात्यात अडकले कोट्यवधी डॉलर्स | एबीपी माझा

काल परवापर्यंत गेरॉल्ड कॉटन हे नाव कॅनडा बाहेर फारसं कोणाला माहित नव्हतं. परंतू आज जगभरातले सायबर तज्ज्ञ त्याच्या बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्यात गुंतले आहेत. त्याचं कारण आहे गेरॉल्डच्या बँक खात्यात जमा असलेले 180 कोटी डॉलर्स. कॅनडाच्या गेरॉल्ड कॉटन हा क्वाड्रीगासी एक्स या क्रिप्टोकरन्सी कंपनीचा सीईओ होता. जेमतेम तिशीत असलेला गेरॉल्ड गेल्या महिन्यात एक अनाथाश्रम सुरु करण्यासाठी भारतात आला होता. भारतात आल्यानंतर गेरॉल्ड आजारी पडला आणि या आजारपणातच त्याचा मृत्यू झाला. परंतू गेरॉल्डच्या बँक खात्यात कंपनीच्या 11 लाख गुंतवणूकदारांचे तब्बल 180 कोटी डॉलर्स अडकले आहेत. त्यामुळे जगभरातील अनेक सायबर तज्ज्ञ सध्या गेरॉल्डच्या बँक अकाउंटचा पासवर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola