Antilia Bomb Scare | मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पीपीई किटमध्ये फिरणारी व्यक्ती कोण?

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर पीपीई किट घालून फिरणाऱ्याचा संपूर्ण व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. याआधीच्या व्हिडीओमध्ये पीपीई किट घालून फिरणारी व्यक्ती पाठमोरी चालत असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता नव्या व्हिडीओमध्ये पीपीई किट परिधान केलेली व्यक्ती समोरच्या बाजूनं चालत असल्याचं दिसतंय. पीपीई किट घालून परिधान केलेली व्यक्ती कोण याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी सचिन वाझे यांनाही पीपीई किट घालून त्याच मार्गावर चालवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola