#Marijuana लॉकडाऊनमुळे शाळा बंद झाली म्हणून शिक्षकाकडून गांजाची तस्करी, नागपूरमधे शिक्षकाला अटक
नागपूरमध्ये 91 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गांजा तस्करी करणारी व्यक्ती ही एक शिक्षक आहे. या तस्कर शिक्षकाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. शिवशंकर इसमपल्ली असं या शिक्षकाचं नाव आहे. दरम्यान, कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं आपण गांजा तस्करी करत असल्याचं या शिक्षकाने पोलिसांना सांगितलं आहे.