Drugs Smuggling : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी भारतातल्या महिलांचा वापर, एनसीबीची कारवाई
Continues below advertisement
Drugs Smuggling : अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी उत्तर भारतातील महिलांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एनसीबीच्या मुंबई आणि दिल्ली युनिटने कारवाई करत दोन इथोपियन नागरिक आणि भारतातील एका महिलेला अटक केली होती. तिच्या चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आफ्रिकन नागरिक उत्तर भारतातील महिलांना टार्गेट करून त्यांच्याशी लग्न करतात. आणि त्यानंतर त्यांचा अंमली पदार्थ्यांच्या तस्करीसाठी वापर करुन घेत असल्याचं उघड झालंय..आफ्रिका खंडातील अंमली पदार्थाच्या तस्करांना भारतात ड्रग्स हब्स बनवायचं असल्याचंही समोर आलंय.. तसंच भारतीय सागरी सीमेचाही वापर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी होत असल्याचंही उघड झालंय.
Continues below advertisement