Virar Station जवळ पूजा आटोपून घरी परतणाऱ्या तरुणाची चोरट्याकडून हत्या
विरार रेल्वे स्थानकाजवळ चोरट्यानं तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री 11 वाजता घडली. विरारमध्ये नातेवाईकांकडे पूजा आटोपून विलेपार्ले इथं घरी येण्यासाठी निघालेल्या तरुणावर चोरट्यानं चाकूहल्ला केला. त्यात 30 वर्षीय तरुण हर्षल वैद्य याचा मृत्यू झाला. हर्षलचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. नवरात्रीत पत्नी आणि सासूसह तो विरारमधील ग्लोबल सिटीमधील नातेवाईकांकडे पूजेसाठी आला होता. रेल्वे स्थानकात चोरट्यानं त्याचं पाकिट हिसकावल्यानंतर हर्षलनं चोराचा पाठलाग केला. श्रेया हॉटेलच्या गल्लीमध्ये त्यानं चोराला पकडलं, पण चोरानं त्याच्यावर चाकूनं वार केले.