Mumbai cruise drugs case : आर्यन खानचा मुक्काम 20 ऑक्टोबरपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच
Drugs Case: क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागणार आहे. प्रदीर्घ सुनावणीनंतर आज न्यायालयाने निकाल राखून ठेवला. एनसीबीने त्याला 2 ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते आणि चौकशीनंतर त्याला अटक केली होती. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
सुनावणीदरम्यान, एनसीबीचे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग म्हणाले की, प्राथमिक तपासात आरोपींचे आंतरराष्ट्रीय लिंक समोर आल्या आहेत. सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण त्यांना स्वतंत्रपणे पाहू शकत नाही. आमच्याकडे व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुरावे आहेत.
अनिल सिंह म्हणाले की, आर्यन खानबद्दल प्राप्त झालेले विधान दर्शवते की तो गेल्या काही वर्षांपासून त्याचे सेवन करत होता. अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहेत. आर्यन त्याच्यासोबत होता. हे दोघेही ड्रग्ज घेणार होते हे पंचनाम्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे.
कोर्टाने अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सतिजा, अक्षित कुमार, मोहक जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि अविन साहू यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली आहे. 2 ऑक्टोबरपासून या प्रकरणात 20 लोकांना अटक करण्यात आली आहे