Solapur Drugs : लहान मुलं नशेच्या जाळ्यात, राजरोसपणे मुलांना विकली जातेय दारू आणि गुटखा
Continues below advertisement
सोलापुरात अल्पवयीन मुलांना नशेच्या जाळ्यात ओढलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यासंदर्भात सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील १५ दिवसाच्या आत ६ गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलांना राजरोजपणे दारु आणि गुटखा विकला जातोय. कामगार, मजूर आणि कष्टकऱ्यांचं शहर अशी ओळख असलेल्या सोलापुरात हजारो कुटुंब झोपडपट्टी भागात राहतात. त्यातील अनेक अल्पवयीन मुलं व्यसनाधीनतेकडे वळल्याचं दिसतंय. त्यात कुणाच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरवलंय, तर कुणाला वाईट संगतीमुळे व्यसन लागलंय. त्यामुळे आता लहान मुलांमधील व्यसनाधीनता थांबवण्यासाठी पोलिसांनी कारवाईचं शस्त्र हाती घेतलं आहे.
Continues below advertisement