करणी उतरवण्यासाठी सहा लाखांच्या कबुतराची विक्री, जादूटोणा कायद्याअंतर्गत भोंदू बाबावर गुन्हा दाखल
पुणे : सतत आजारी असणाऱ्या व्यक्तीला तुमच्यावर घटस्फोटीत पत्नीनेच काळी जादू केली असून त्यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावे लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन भोंदूबाबावर पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात कुतुबुद्दीन नजमी आणि हकिमुद्दीनराज मालेगावंवाला या आरोपींवर जादूटोणा प्रतिबंधात्मक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अबिझर जुझर फतेपुरवाला यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली आहे.