Solapur | सोलापूर विद्यापीठात बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांचे गुण वाढवल्याने चौघांना अटक
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठात विद्यार्थ्यांचे गुण बेकायदेशीररित्या वाढवल्याप् रकरणी विद्यापीठाचे परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे तत्कालीन संचालकासह चौघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. काही विद्यार्थ्यांचे गुण हे बेकायदेशीररित्या वाढवल्याप्रकरणी विद्यापीठातर् फे 25 डिसेंबर 2019 रोजी फौजदार चावडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरण तांत्रिक असल्याने त्याचा तपास पोलिस आयुक्तालयाच्या सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलिसांनी केलेल्या या तपासात चौघांविरुद्ध सबळ पुरावे आढल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली आहे.