Sachin Waze WhatsApp 'आता गुडबाय म्हणायची वेळ आली', वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा नेमका अर्थ काय?
गणेश ठाकूर, एबीपी माझा
Updated at:
13 Mar 2021 02:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : मनसुख हिरण मृत्यू प्रकरणानंतर उडालेल्या गोंधळामध्ये संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले पोलीस आधिकारी सचिन वाझे यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांची क्राईम ब्रान्चमधून बदली देखील करण्यात आली आहे. आता सचिन वाझेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसनं खळबळ उडाली आहे. 'जगाला गुड बाय म्हणायची वेळ आलीय, आता माझ्याकडे पेशन्स नाहीत', अशा आशयाचं व्हॉट्सअॅप स्टेटस सचिन वाझेंनी ठेवलं आहे.