Sachin Vaze Case | सचिन वाझे यांना पुन्हा 3 एप्रिलपर्यत NIA कोठडी

मुंबई : सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 3 एप्रिलपर्यंत सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. तसेच युक्तीवादा दरम्यान, मला बळीचा बकरा बनवलं जातंय, मी दीड दिवस या प्रकरणाचा तपास अधिकारी होतो, जी चौकशी करायची होती, ती करुन झालीये, आता आणखी एनआयए कोठडी देऊ नका, मला कोर्टाला आणखी काही गोष्टी सांगायच्या आहेत, अशी माहिती सचिन वाझे यांनी कोर्टात दिली आहे. यावर तुम्हाला जे काही सांगायचे आहे, ते लेखी लिहून द्या, असे निर्देश एनआयए कोर्टानं सचिन वाझे यांना दिले आहेत. 

अँटिलिया स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्याविरोधात आता गैरकायद कृत्य प्रतिबंधित अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दहशतवादी कृत्य किंवा राष्ट्रविरोधी कारवायांविरोधात ही कलमं लावली जातात. एनआयएने बुधवारी विशेष एनआयए कोर्टाला या प्रकरणात यूएपीए कलम लावण्याविषयी माहिती देताना अर्ज दाखल केला होता. वाझे यांच्यावर यूएपीएच्या कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात आज एनआयए कोर्टात सुनावणी करण्यात आली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola