Ratnagiri : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरचे दागिने चोरीला, जिल्हा रुग्णालयातील प्रकार ABP Majha

Continues below advertisement

रत्नागिरी : कोरोनाबाधित मृत रूग्णाच्या अंगावरील दागिने चोरीला गेल्याची घटना रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात घडली आहे. मृत महिलेच्या हातातील दोन सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्याचं नातेवाईकांच्या ध्यानात आले. त्यानंतर त्यांनी सदर बाब जिल्हा शल्य चिकित्सकांच्या कानावर घातली. यानंतर चौकशी केली असता चतुर्थ श्रेणी कंत्राटी महिला कर्मचाऱ्यानं दागिने लांबवल्याचं समोर आलं आहे. याबाबत चौकशी करत संबंधितांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अहोरात्र मेहनत करत रूग्ण सेवा केली. पण, शनिवारी घडलेल्या या प्रकारामुळे मात्र कुठंतरी नाराजीचा सुरू दिसून आला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram