पोलीस उपनिरीक्षकानं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप, तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
पुण्यात एका पोलीस उपनिरीक्षकानं लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीनं केलाय. तरुणीच्या तक्रारीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जरदेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन वर्षांपूर्वी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या एका तरुणीची या पोलीस उपनिरीक्षकाशी ओळख झाली. ओळखीचं रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यानं तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून दोन वर्षांपासून बलात्कार केला. पण प्रवीण जरदे विवाहित असल्याचं लक्षात आल्यानंतर तिनं पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.