वाहनचालकाची मुजोरी, वाहतूक पोलिसाला बोनेटवर बसवून नेलं, काही तासातच चालकाला बेड्या
Continues below advertisement
मुंबईत कर्तव्य बजावत असलेल्या एका वाहतूक पोलिसाला एका कारचालकानं आपल्या वाहनाच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंधेरीच्या डीएन नगर परिसरात हा प्रकार घडला. संबंधित वाहतूक पोलिसाचे नाव विजय गुरव असं आहे. गुरव हे अंधेरी पश्चिमेला आझाद नगर मेट्रो स्टेशन परिसरात जे पी रोड येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एका चालकानं नो एन्ट्रीमध्ये कार घुसवली. त्यावेळी वाहतूक पोलीस गुरव यांनी त्या गाडी चालकाला अडवलं. पोलिसानं अडवल्यानंतरही कारचालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यामुळं गुरव यांनी त्याला थांबवण्यासाठी कारच्या बोनेटवर उडी मारली. तरीही कारचालक थांबण्याच्या मनस्थितीत नव्हता. विशेष म्हणजे स्थानिकांनी हस्तक्षेप केल्यानंतर कारचालक तिथे थांबला. याप्रकरणी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement