Pune : CA चा रिसेप्शनिस्ट महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचे आरोप

Continues below advertisement


पुण्यातील अनिरुद्ध शेठ या चार्टर्ड अकाउंटंटवर त्याच्या ऑफिसमधील रिसेप्शनीस्ट महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आलाय.   रिसेप्शनीस्ट महिलेला पेस्ट्री आणि कोल्ड्रिंक्स मधुन गुंगीचे औषध पाजून अनिरुद्धने बलात्कार केल्याचा आणि त्याचा व्हिडीओ तयार केल्याचा आरोप आहे.  सदर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनिरुद्ध शेठ आपल्यावर गेल्या काही दिवसांपासून बलात्कार करत होता असा त्याच्यावर आरोप आहे. येरवडा पोलीस ठाण्यात अनिरुद्ध शेठवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram