Aftab Poonawalla Narco Test : आफताबची आज नार्को टस्ट? नेमकी काय असते नार्को टेस्ट? ABP Majha
Aftab Poonawalla Narco Test : आफताबची आज नार्को टस्ट? नेमकी काय असते नार्को टेस्ट? ABP Majha
नार्को टेस्टसाठी कोणतं औषध देतात?
एनेस्थेशिया तज्ज्ञ डॉ. अभिषेक चंद्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीची नार्को टेस्ट करायचीय, त्या व्यक्तीच्या नसांमध्ये सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाईन आणि सोडियम अमायटलचं इजेक्शन दिलं होतं. एनेस्थिशियच्या माध्यमातून हे इंजेक्शन दिलं जातं. या इंजेक्शनमुळे व्यक्तीला ग्लानी येण्यास सुरुवात होते. काही प्रमाणात तो बेशुद्ध असल्यासारख्या अवस्थेत असतो. पण तो पूर्णपणे बेशुद्ध झालेला नसतो. फक्त ती व्यक्ती कोणताही विचार करण्यास त्या अवस्थेत असक्षम असते. अशा अवस्थेत सदर व्यक्तीला प्रश्नोत्तर केल्यास ती खरखरं बोलून टाकण्याची शक्यता दाट असते, असं जाणकार सांगतात. झोपेसारख्या अवस्थेत नार्को टेस्ट करणाऱ्या व्यक्तीकडून असा गोष्टींची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न असतो, ज्यावर शुद्धीत ती व्यक्ती बोलणं टाळेल, किंवा शक्यतो खरं सांगणार नाही. यासाठी नार्को टेस्टच्या दरम्यान, मॉल्यिक्युलर पातळीवर त्या व्यक्तीच्या नर्व्ह सिस्टममध्ये दखल देत सदर व्यक्तीचं अवघडलेपण कमी करण्याचाही प्रयत्न होतो.